Android app on Google Play

 

गांधारी

 


त्या वेळी गांधार राजकुमारीच्या रूप आणि लावण्याची चर्चा संपूर्ण अर्यवर्तात होती. अशातच पितामह भीष्म यांनी धृतराष्ट्र यांचा विवाह गांधार राजकुमारीशी करण्याचा विचार केला. आधी त्यांनी विचार केला कि गांधारीचे अपहरण करून तिला आणावे, परंतु अंबिका आणि अब्मालिका यांनी त्यांना असे करण्यास मनाई केली. शेवटी भीष्म धृतराष्ट्रासाठी गांधारीला मागणी घालण्यासाठी गांधार च्या राज्यसभेत गेले, परंतु त्यांना माहित होते कि त्यांचा प्रस्ताव ठोकरला जाणार आहे.
तेव्हा भीष्मांनी क्रोधाने सांगितले कि मी तुझ्या या छोट्या राज्यावर आक्रमण करून त्याला नष्ट करून टाकेन. त्यामुळे राजा सुबाल याला भिष्मांसमोर झुकावे लागले आणि अत्यंत क्षोभाने आपली सुंदर मुलगी गांधारी हिचा विवाह आंधळा राजकुमार धृतराष्ट्र याच्याशी करून द्यावा लागला.
गांधारीने देखीउल दुःखाने आजन्म डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवण्याची प्रतिज्ञा केली. गांधारीपासून धृतराष्ट्राला १०० पुत्र झाले होते. हेच पुत्र पुढे कौरव या नावाने प्रसिद्ध झाले. प्रत्यक्षात ते कौरव नव्हते.