Android app on Google Play

 

गंधार राजपुत्र

 


शकुनी हे गंगाधर नरेश राजा सुबाल याचे पुत्र होते. शकुनीचा जन्म गांधार चा राजा सुबाल याच्या राजप्रासादात झाला होता. माता गांधारी हिचा तो छोटा भाऊ होता. जन्मापासूनच तो अत्यंत विलक्षण बुद्धीचा स्वामी होता आणि राजा सुबाल याला तो अत्यंत प्रिय होता.
अनेक छोटी छोटी राज्य मिळून आर्यांचे क्षेत्र बनले होते. याच क्षेत्रात गांधार राज्य होते. आजच्या उत्तर अफगाणिस्तान ला त्या काळी गांधार म्हटले जायचे जे कम्बोज च्या जवळ होते. गांधार राज्यातच हिंदुकुश पर्वतमाला होती. कंदाहर किंवा कंधार हे गांधार चाच अपभ्रंश आहे. कौरवांना कपात आणि छल शिकवणारे शकुनी त्यांना पांडवांचा विनाश करण्यासाठी प्रत्येक वेळी मदत करत होते, परंतु त्यांच्या मनात कौरवांबद्द्ल केवळ सुडाची भावना होती.