Android app on Google Play

 

त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगत्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात आहे. येथील ब्रम्हगिरी पर्वतामधुन गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. मंदिराच्या आत छोट्या खड्यामध्ये तीन लिंग आहेत. हि तीन लिंगे ब्रम्हा, विष्णु, शिव यांचे प्रतिक मानले जाते. ब्रम्हगिरी पर्वतावर जाण्यासाठी सातशे पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत. या पायऱ्यांवर पुढे चालत गेल्यावर रामकुंड आणि लक्ष्मणकुंड भेटते, आणि पर्वतावर गेल्यावर गोमुखातून वाहणाऱ्या भगवती गोदावरीचे दर्शन होते. भगवान शिवांना तंत्र विद्येचे देवता मानले जाते. तंत्र आणि अघोरवादाचे जन्मदाते भगवान शिवच आहेत. त्रंबकेश्वरमध्ये असलेले स्मशान हे सुद्धा तंत्रविद्येसाठी प्रसिध्द आहे.