Android app on Google Play

 

अघोरी साधना


अघोरी मुख्यतः तीन प्रकारच्या साधना करतात, शिव साधना, शव साधना, स्मशान साधना. शिव साधनेमध्ये शवाच्यावर उभ राहुन साधना केली जाते बाकी सर्व पद्धती शव साधने प्रमाणे केल्या जातात. अशा साधनेमध्ये शवाला प्रसादाच्या स्वरुपात मासं आणि दारु अर्पण केली जाते. शव आणि शिव साधनेच्या व्यतिरिक्त तिसरी साधना असते स्मशान साधना ज्यात परिवारातील इतर लोकांनाही सहभागी केलं जात. या साधनेत मृत व्यक्तीच्या जागी शवपीठ म्हणजे ज्या जागी मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार केला गेला होता ती जागा त्याची पूजा केली जाते. त्याच्यावर गंगाजल शिंपडले जाते. तिथे प्रसादाच्या स्वरुपात मासं आणि दारूच्या जागी मावा चढवला जातो.  अघोरी शव साधनेसाठी शव कुठून आणतात ? हिंदु धर्मात आजही पाच वर्षा खालील मुले, साप चावून मेलेली माणसे, आत्महत्या केलेल्या  लोकांचे शरीर जाळले जात नाही. असे शरीर पुरले जाते किंवा गंगेत विसर्जित केले जाते. अशी शरीरे तांत्रिक शोधुन काढतात आणि त्याचा उपयोग तंत्र विद्येसाठी करतात.