तारापीठ मंदिर
तारापीठ हे मंदिर पश्चिम बंगाल मधील वीरभूमी जिल्ह्यातील छोट्याश्या शहरात आहे. या मंदिरातील काली मातेची प्रतिमा तारा मातेच्या नावाने प्रसिद्ध आहे. रामपुर पासुन तारापीठ हे सुमारे ६ किलोमीटर अंतरावर आहे. पुराणातील कथेनुसार या ठिकाणी देवी सती यांचे नेत्र पडले होते त्यामुळे या ठिकाणाला नयनतारा असेही म्हणतात. तारापीठ मंदिराचे पटांगण स्मशानभूमीच्या जवळ आहे. या स्मशानभूमील महास्मशानभूमी असेही नाव पडले आहे. असे म्हटले जाते की या स्मशाणभूमीत जाळल्या गेलेल्या चितेची अग्नी कधीच विझत नाही. येथे येणाऱ्या लोकांना कशाच प्रकारचे भय रहात नाही. मंदिराच्या चहूबाजुनी द्वारका नदी वाहते. या स्मशानात अनेक साधक आपली साधना पूर्ण करायला येतात.