स्येद मोदी
स्येद मोदींची दि. २८ जुलै १९८८ ला गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात ७ जणांवर आरोप ठेवण्यात आला ज्यामध्ये त्यांची पत्नी अमिता आणि तिचा भावी पती संजय सिंह याचे नाव होते. परंतु अमिता आणि संजय सिंह यांच्या विरोधातील प्रकरण गोलमाल करून मिटवून टाकण्यात आले आणि नंतर त्यांनी विवाह केला.
दोन अपराधी अखिलेश आणि जितेंद्र सिंह यांना वेगवेगळी शिक्षा झाली आणि दोन - अमर बहादूर आणि बलाई सिंह यांचा निकालापूर्वीच मृत्यू झाला. सी बी आय ने अमिता आणि संजय सिंह यांना घटनेनंतर काही दिवसातच अटक केली होती, परंतु सरकार दरबारी संजय सिंह चे वजन असल्यामुळे दोघानाही मुक्त करण्यात आले. पुराव्यांमध्ये होते अमितच्या आईची तिची मुलगी आकांक्षा हिच्या वडिलांबद्दल सत्याशी निगडीत पत्र आणि एक पत्र ज्यात स्येद मोदीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.