Get it on Google Play
Download on the App Store

राजीव दीक्षित




राजीव दिक्षित हे एक सामाजिक कार्यकर्ते होते, ज्यांचा मृत्यू वयाच्या ४३ व्या वर्षी ३० नोव्हेंबर २०१० ला झाला होता.
ते जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण इत्यादींच्या दुष्परिणामाबद्दल आपली मते मांडत असत. ते करांच्या विकेंद्रीकरणाचे समर्थन करत आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देत असत. दुर्दैवाने आपल्या या गुणांमुळे त्यांनी सरकार आणि मोठ्या कंपन्यांमध्ये अनेक शत्रू निर्माण करून ठेवले होते.
त्यांचा मृत्यू ३० नोव्हेंबर २०१० रोजी भिलाई, छत्तीसगड इथून परतत असताना हृदय विकाराच्या झटक्याने झाला . परंतु त्यांच्या अशा आकस्मिक मृत्यू नंतर देखील त्यांच्या मृतदेहाचे परीक्षण (विच्छेदन) झाले नाही. त्यांचे मृत शरीर काळे निळे पडले होते. याचा अर्थ त्यांना विष देण्यात आले होते. परंतु प्रसार माध्यमांनी देखील या गोष्टीवर भाष्य केले नाही आणि अजूनपर्यंत समजलेले नाही की नक्की काय झाले होते.