होमी भाभा
भारतीय परमाणु कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचा १९६६ मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युनंतर लोकांनी सी आय ए ला त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले कारण त्यांना भारताचा परमाणु कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच त्याचा खात्मा करायचा होता. असे म्हणतात की ताश्केंत इथला शास्त्रींचा मृत्यू आणि भाभा यांचा मृत्यू यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे दोन्हीत सी आय ए चा हात असणे.