Android app on Google Play

 

सुनंदा पुष्कर

 

सुनंदा पुष्कर कॉन्ग्रेस नेता शशी थरूर यांच्या पत्नी होत्या. दुबई ची टेकाम इन्वेस्टमेंट्स या कंपनीत त्या सेल्स मेनेजर या पदावर कार्यरत होत्या. एक पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यासोबत ट्विटर वर एका वादात आल्यानंतर पुढच्या दिवशी चाणक्यपुरी च्या हॉटेल लीला पलेस मधील खोली नंबर ३४५ मध्ये त्या मृतावस्थेत आढळून आल्या.
आधी असे सांगण्यात आले की त्यांनी आत्महत्या केली. नंतर बातम्या येऊ लागल्या की त्यांच्या मृत्यूचे कारण रहस्यमय आहे. १ जुलै २०१४ ला घटनेने गंभीर वळण घेतले जेव्हा डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सांगितले की त्यांना चुकीचा रिपोर्ट तयार करायला सांगण्यात आले होते.
१० ऑक्टोबर २०१४ ला त्यांच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या तुकडीने निष्कर्ष काढला की त्यांनी विष प्राशन केल्याने मृत्यू झाला. ६ जानेवारी २०१५ ला दिल्ली पोलिसांनी खबर दिली की सुनंदाचा खून झाला होता आणि या बाबतीत त्यांनी नवीन एफ आय आर दाखल केली. अजूनही या घटनेबाबत कोणताही पक्का निष्कर्ष निगलेला नाही आणि तपास अजूनही चालू आहे.