Get it on Google Play
Download on the App Store

श्री रेवन्तेश्वर महादेव
सूर्याचे तेज सहन होत नाही म्हणून त्याची पत्नी संज्ञा त्याला सोडून गेली आणि तपश्चर्या करू लागली. ही गोष्ट सूर्याला समजली तेव्हा तो कुरुक्षेत्रावर गेला. इथे त्याने संज्ञाला घोडीच्या रुपात पहिले.तेव्हा ती भगवंतांच्या समोर आली आणि आपल्या नासिकेतून अश्विनी कुमार नावाच्या घोड्याचे मुख असलेल्या बालकाला जन्म दिला. रेतीतून रेवंत पुत्र तलवार घेऊन उत्पन्न झाला. बालपणीच त्याने तिन्ही लोक जिंकले. सर्व देवता घाबरून ब्रम्हदेवाला शरण आले. ब्रम्हदेवाने त्यांना भगवान शंकरांकडे पाठवले.
देवतांनी शंकराला सांगितले की अश्विनी कुमारच्या तेजामुळे सारी सृष्टी जाळून जात आहे. तुम्ही त्यांची रक्षा करा. शंकराने अश्विनी कुमारचे स्मरण केले आणि अश्विनी कुमार शंकरांकडे आला. शंकराने त्याला प्रेमाने मांडीवर घेतले आणि सांगितले की महाकाल वनात कंटेश्वर च्या पूर्वेला एक शिवलिंग आहे, तू त्याचे दर्शन पूजन कर आणि तिथेच वास्तव्य कर. देवता तुझी पूजा करतील आणि तू राजांचा राजा होशील. अश्विनी कुमार शंकराची आज्ञा ऐकून महाकाल वनात आला आणि इथे येऊन शिवलिंगाचे दर्शन पूजन केले. रेवंत ने पूजन केल्यामुळे हे शिवलिंग रेवन्तेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते की जो कोणी मनुष्य या महादेवाचे दर्शन पूजन करतो त्याच्या ७ पिढ्या सुखी होतात आणि अंती तो स्वर्गाला जातो.