Get it on Google Play
Download on the App Store

श्री प्रयागेश्वर महादेव


प्रथम कल्पात स्वयंभू मनु राजा नावाचा राजा होऊन गेला. त्याचा पुत्र म्हणजे प्रियावत नावाचा राजा हा परम धार्मिक होता. त्याने यज्ञ करून उत्तम दान करून यज्ञ समाप्त केला आणि आपल्या ७ पुत्रांना ७ द्वीपांच्या राज्यांचे राजा बनवून स्वतः बद्रीनारायणाच्या विशाल नगरीत तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. तो तिथे तपश्चर्या करण्यात मग्न झाला. नगरीत फिरताना एकदा नारद मुनी तिथे आले आणि राजाला म्हणाले की मी श्वेत द्वीपाच्या सरोवरात एक कन्या बघितली आहे. तिला विचारले की या विशाल द्वीपावर तू एकटी का राहतेस? त्या कन्येला तिचे नाव विचारले तेव्हा ती म्हणाली की नारदा तू आपले डोळे बंद कर, तुला सगळे काही माहिती पडेल. नारदाने डोळे बंद केले तेव्हा त्याला कन्येच्या जागी तीन दिव्य पुरुष दिसले. नारदाने आपल्या शक्तींचा उपयोग करून पहिले, परंतु त्या कन्येच्या बाबतीत काहीही समजले नाही. त्यानंतर नारदाने कन्येला विचारले की देवी तू कोण आहेस? तुझ्यासमोर माझ्या सर्व शक्ती विफल ठरल्या. त्यावर ती कन्या म्हणाली की मी सर्व वेदांत निपुण अशी सावित्री माता आहे. सर्व वृत्तांत सांगताना नारद राजाला म्हणाला की मी माझ्या सर्व शक्ती विसरलो होतो. सावित्री मातेने मला सांगितले की तू प्रयाग राज्यात जा, तिथे गेल्यावर तुला तुझ्या सर्व शक्ती परत मिळतील. एवढे बोलून प्रयाग च्या राजाला नारदांनी विचारले की मला वेद आणि शक्तींचे पुन्हा ज्ञान व्हावे यासाठी काही उपाय सांग. राजाने उपाय सांगत म्हटले की मुनिवर तुम्ही महाकाल वनात जा. तिथे प्रयागचे राजा विराजमान आहेत. इथेच सनातन ज्योतिष रुपात शिवलिंग स्थित आहे. त्याची तुम्ही प्रयाग राजाच्या नावाने पूजा करा. भविष्यात या शिवलिंगाला प्रयागेश्वर महादेवाच्या नावाने वंदिले जाईल. असे मानले जाते की जो कोणी मनुष्य प्रयागेश्वर महादेवाचे पूजन करतो तो अक्षय स्वर्गलोकात वास्तव्य करतो. याच्या मात्र दर्शनानेच सर्व पाप नष्ट होते.