Get it on Google Play
Download on the App Store

वाली - सुग्रीव यांचे किष्किंधा राज्य


तुंगभद्रा नदी दक्षिण भारतातील एक पवित्र नदी आहे, जी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश इथे वाहते. ही नदी छत्तीसगड मधील रायपूर जवळ कृष्ण नदीला जाऊन मिळते. प्रसिद्ध पर्यटन स्थळ हम्पी तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले आहे. या नदीचा जन्म तुंगा आणि भद्रा नदीच्या मिलनाने होतो, म्हणून या नदीचे नाव तुंगभद्रा असे आहे. तिच्या उगमाच्या स्थानाला गंगामूल म्हटले जाते, जे श्रुंगगिरी किंवा वराह पर्वताच्या पायथ्याशी आहे.
जिथून तुंगभद्रा नदी धनुष्याच्या आकारात वाहते तिथेच ऋष्यमूक पर्वत आहे आणि त्याच्यापासूनच एक मैल अंतरावर किष्किंधाचे क्षेत्र सुरु होते. या पर्वताच्या अगदी जवळच कर्नाटकातील प्रसिद्ध शिव मंदिर, विरुपाक्ष मंदिर आहे, जे हम्पीच्या हद्दीत येते. ते आजच्या बेल्लारी जिल्ह्यात स्थित आहे. इथून गोवा पश्चिम-उत्तरेला तेवढ्याच अंतरावर आहे जेवढ्या अंतरावर तुंगभद्रेचे उगमस्थान आहे. गंगामूल पासून गंगावती आणि गंगावती पासून गोवा. गंगावतीच्या जवळच किष्किंधा राज्य होते जे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर स्थित आहे.