हनुमानाचा जन्म
हनुमानाच्या जन्मस्थानाच्या बाबतीत अजूनपर्यंत काहीही निश्चित समजलेले नाही. मध्यप्रदेश इथल्या आदिवासींचे म्हणणे आहे की हनुमानाचा जन्म रांची येथील गुमला परमंडळ च्या अंजन गावात झाला होता. कर्नाटक वासीयांची धारणा आहे की हनुमान कर्नाटकात जन्माला आला होता. पंपा आणि किष्किंधा यांचे भग्नावशेष आजही हम्पी येथे दिसून येतात. 'अपनी रामकथा' मध्ये फादर कामिल बुल्के यांने लिहिले आहे की काही लोकांच्या मते हनुमान वानर पंथात जन्माला आला होता.
हनुमानाचा जन्म कसा झाला याविषयी देखील वेगवेगळी मते आहेत. एक मान्यता आहे की पुन्हा पुन्हा जेव्हा मारुतीने अंजनीला जंगलात पहिले तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला. त्याने अंजनीशी संयोग केला आणि ती गर्भवती झाली. एक आणखी समजूत आहे की वायुने अंजनीच्या कानामार्गे शरीरात प्रवेश केला आणि ती गर्भवती झाली.
एका अन्य कथेनुसार जेव्हा राजा दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाचा त्याला जो प्रसाद मिळाला होता, तो आपल्या राण्यांमध्ये तो वाटत असताना त्यातला एक तुकडा एका गरुडाने उचलून नेला होता आणि त्या गरुडाने तो तुकडा जिथे माता अंजनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करत होती त्या जागेवर नेऊन टाकला. तो प्रसाद खाल्ल्याने अंजनी गर्भवती झाली आणि कालांतराने तिने हनुमानाला जन्म दिला.
तुलसी आणि वाल्मिकी यांनी वर्णन केलेल्या हनुमान - चरित्राच्या तुलनेत अनेक अन्य रामकथांमध्ये वर्णीत चरित्र एवढे वेगळे आहे की हे सर्व काही दांभिक आणि काल्पनिक वाटावे.