Get it on Google Play
Download on the App Store

सर्वांत आधी हनुमानाने लिहिले होते रामायण


हनुमानाला शंकराचा अवतार तसेच रुद्रावतार मानले जाते. रुद्र वादळ - तुफान यांचे अधिष्ठान दैवत देखील आहे आणि देवराज इंद्राचे साथी देखील. विष्णू पुराणानुसार रुद्राची उत्पत्ती ब्रम्हदेवाच्या भुवईमधून झाली होती. हनुमान वायुदेव अथवा मारुती नामक रुद्राचे पुत्र आहेत. सर्वप्रथम रामकथा हनुमानाने लिहिली होती आणि ती पण शिळेवर. ही रामकथा वाल्मिकी रामायणाच्या देखील आधी लिहिली गेली आणि ती हनुमन्नाटक या नावाने प्रसिद्ध आहे.