Get it on Google Play
Download on the App Store

कुठे गेला अश्वत्थामा?


अशा प्रकारे हिंसा, अभिशाप, क्रोध, विषाद यातच या महान विद्वान आणि महापराक्रमी अजेय वीराच्या कथेची सांगता होते. युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला होता की एकट्या अश्वत्थामाने एवढे मोठे कांड कसे केले? कृप, हर्दीक्य आणि अश्वत्थामा या तिघांनी महाविनाशाचा हा वृत्तांत धृतराष्ट्राला सांगितला. सांगितले की आम्ही ३ आहोत आणि पांडव ५ आहेत. बाकी कुणीही वाचलेले नाही. नंतर ते तीन दिशांना निघून गेले. कृप हस्तिनापुरात गेले. कृतवर्मा द्वारकेला आणि अश्वत्थामा (द्रौणी) व्यासांसोबत वनात निघून गेला. आजही भारताच्या जंगलांतून अश्वत्थामा दिसल्याच्या घटना नोंद होतात. कधी तो मध्य प्रदेश च्या जंगलात दिसला, कधी ओडीसाच्या तर कधी उत्तराखंडच्या. अश्वत्थामा आजही जिवंत आहे आणि तो विश्वच्या अंतापर्यंत जिवंत राहणार.