जन्माचे रहस्य
अश्वत्थामाचा जन्म भारद्वाज ऋषींचा पुत्र द्रोण यांच्याकडे झाला होता. त्याची माता म्हणजे ऋषी शरद्वान यांची मुलगी कृपी ही होय. द्रोणाचार्यांचे गोत्र अंगिरा होते. तपश्चर्येत मग्न असलेल्या द्रोणांनी आपल्या पितरांच्या आज्ञेवरून संतान प्राप्तीसाठी कृपिशी विवाह केला होता. कृपी देखील अतिशय धार्मिक, सुशील आणि तपस्विनी होती. दोघेही समृद्ध परिवारातून होते. जन्म होताच अश्वत्थामाने उच्चैःश्रवा (घोडा) प्रमाणे घोर आवाज केला, जो दही दिशांत घुमला. तेव्हाच आकाशवाणी झाली की या विशिष्ट बालकाचे नाव अश्वत्थामा असेल.