Android app on Google Play

 

वडिलांचा अपमान

 द्रोणांनी जेव्हा आपल्या पुत्राची ही अवस्था बघितली तेव्हा या परिस्थितीचा सगळा दोष त्यांनी स्वतःला दिला. आपल्या मुलासाठी गायीची व्यवस्था करण्यासाठी ते जागोजागी धर्मादाय दान मिळवण्यासाठी भटकले, परंतु कोणीही त्यांना गाय दान म्हणून दिली नाही. शेवटी त्यांनी विचार केला की यापेक्षा आपला बालपणीचा मित्र राजा द्रुपदाकडे जावे.
ते आपला पुत्र अश्वत्थामा सोबत राजा द्रुपदाच्या दरबारात पोचले. राजा द्रुपदाच्या दरबारात आपल्या वडिलांचा झालेला घोर अपमान अश्वत्थामाने पहिला होता. त्यांची हतबलता पहिली होती. आणि दैवाची अशी क्रूर विटंबना देखील पहिली होती की अस्त्र - शस्त्र यांच्या महान दात्याला देखील सत्तासीन मदमस्त मुजोर व्यक्तीकडून अपमानित व्हावे लागते. अश्वत्थामाच्या बालमनावर त्यावेळी काय परिणाम झाला असेल, जेव्हा त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या पित्याला तिथून अक्षरशः धक्के मारून बाहेर काढण्यात आले होते!