Android app on Google Play

 

अश्वत्थामा बनला शिक्षक आणि राजा

 


अश्वत्थामाला घेऊन द्रोणाचार्य पांचाल राज्यातून कुरु राज्यात हस्तिनापुरात आले आणि तिथे काही कुमारांना धनुष्य बाणाचे शिक्षण देऊ लागले. तिथे ते कृप शास्त्राचे शिक्षण देत असत. अश्वत्थामा देखील वडिलांना या कामात मदत करू लागला. तो देखील कुरु युवकांना धनुर्विद्या शिकवत असे. पुढे द्रोण कौरवांचे गुरु बनले. त्यांनी दुर्योधानापासून अर्जुनापर्यंत सर्वाना शिकवले. आपल्या गुरूला आदर देण्यासाठी पांडवानी गुरुदक्षिणा म्हणून राजा द्रुपदाचे राज्य जिंकून द्रोणांना दिले. नंतर द्रोणाचार्यांनी अर्धे राज्य द्रुपदाला परत केले आणि अर्धे अश्वत्थामाला दिले. उत्तर पांचाल चे अर्धे राज्य घेऊन अश्वत्थामा तिथला राजा बनला आणि त्याने अहिच्‍छ्त्र ही आपल्या राज्याची राजधानी बनवली. आता द्रोण हे संपूर्ण भारतातील सर्वश्रेष आचार्य होते. कुरु राज्यात त्यांना भीष्म, धृतराष्ट्र, विदुर इत्यादींकडून पूर्ण सन्मान मिळत असे. आता दिवस पालटले होते.