जनक नंदिनी सीता हिच्या जन्माची कहाणी
जनक नंदिनी सीता हिच्या जन्माची कहाणी : -
प्रभू श्रीरामांची पत्नी सीता हिचा जन्म देखील मातेच्या गर्भातून झाला नव्हता. रामायणानुसार तिचा जन्म धरतीतून झाला होता. वाल्मिकी रामायणाच्या बाल कांड मध्ये राजा जनक महर्षी विश्वामित्रांना सांगतो की -
अथ मे कृषत: क्षेत्रं लांगलादुत्थिता तत:।
क्षेत्रं शोधयता लब्धा नाम्ना सीतेति विश्रुता।
भूतलादुत्थिता सा तु व्यवर्धत ममात्मजा।
अर्थात - एक दिवस मी यज्ञासाठी जागा शोधत असताना शेतात नांगर चालवत होतो. त्याच वेळी नांगराच्या अग्रभागाने खणल्या गेलेल्या जमिनीतून एक कन्या प्रकट झाली. सीतेतून (नांगराने ओढलेली रेष) उत्पन्न झाल्यामुळे तिचे नाव सीता असे ठेवण्यात आले. पृथ्वीतून प्रकट झालेली ही माझी कन्या क्रमशः वाढून मोठी झाली.