Android app on Google Play

 

राधाच्या जन्माची कथा

 


ब्रह्म वैवर्त पुराणानुसार एकदा गोलोकात कोणत्यातरी गोष्टीवरून राधा आणि एक गोपी यांच्यात वाद झाला. यामुळे राधाने त्या गोपीला असुर योनीत जन्माला येण्याचा शाप दिला. तेव्हा त्या गोपीने देखील राधेला शाप दिला की तुम्हालाही मानव योनीत जन्माला यावे लागेल. तिथे गोकुळात श्रीहरींचेच अंश महायोगी रायाण नावाचे एक वैश्य असतील. तुमचे छायारुप त्यांच्यासोबत नेहमी राहील. भूतलावर लोक तुम्हाला रायाण ची पत्नी म्हणूनच ओळखतील. श्रीहारीन्सोबत काही काळ तुमचा सहवास असेल. ब्रह्म वैवर्त पुराणानुसार जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या अवताराची वेळ आली तेव्हा त्यांनी राधेला सांगितले की तू लवकरच वृषभानुच्या घरात जन्म घे. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरूनच राधा व्रज येथे वृषभानु वैश्य याच्या घरात जन्माला आली. राधा अयोनिजा होती, मातेच्या गर्भातून जन्म घेतला नव्हता. त्यांच्या मातेने गर्भात वायू धारण करून ठेवला होता. त्यांनी योगामायेच्या प्रेरणेने वायुलाच जन्म दिला होता, परंतु तिथे स्वेच्छेने राधा प्रकट झाली.

 

अद्भुत पौराणिक जन्म कथा

passionforwriting
Chapters
धृतराष्ट्र, पण्डु आणि विदुर यांच्या जन्माची कथा :
कौरवांच्या जन्माची कहाणी
पांडवांच्या जन्माची कथा
कर्णाच्या जन्माची कथा
राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा
पवन पुत्र हनुमानाच्या जन्माची कथा
हनुमान पुत्र मकरध्वज याच्या जन्माची कथा
द्रोणाचार्य यांच्या जन्माची कथा
ऋषि ऋष्यश्रृंग यांच्या जन्माची कथा
कृपाचार्य आणि कृपी यांच्या जन्माची कथा
द्रौपदी व धृष्टद्युम्न यांच्या जन्माची कथा
राधाच्या जन्माची कथा
राजा सगर याच्या ६० हजार पुत्रांच्या जन्माची कथा
जनक नंदिनी सीता हिच्या जन्माची कहाणी
मनु व शतरूपा यांच्या जन्माची कहाणी
राजा पृथु याच्या जन्माची कथा