कर्णाच्या जन्माची कथा
कर्णाचा जन्म कुंतीला मिळालेल्या एका वारादानाच्या स्वरूपाने झाला होता. जेव्हा ती कुमारिका होती, तेव्हा एकदा दुर्वास ऋषी तिच्या पित्याच्या महालात आले. तेव्हा कुंतीने पूर्ण एक वर्षापर्यंत त्यांची खूप चांगली सेवा केली. कुंतीच्या या सेवाभावाने दुर्वास ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने हे पहिले की कुंतीला पंडूपासून अपत्य होऊ शकणार नाही, आणि म्हणून तिला वर दिला की ती कोणत्याही देवाचे स्मरण करून त्याच्यापासून संतान उत्पन्न करू शकेल. एक दिवस उत्सुकतेपोटी कुमारिका असतानाच कुंतीने सूर्यदेवाचे ध्यान केले. त्यामुळे सूर्यदेव प्रकट झाले आणि त्यांनी तिला एक पुत्र दिला जो त्यांच्या एवढाच तेजस्वी होता, आणि तो कवच - कुंडले घेऊन जन्माला आला होता, जी जन्मापासूनच त्याच्या शरीराला जोडलेली होती. परंतु अजूनही कुमारिका असल्याने लोकलज्जेस्तव तिने त्या पुत्राला एका खोक्यात ठेवून गंगेच्या प्रवाहात सोडून दिले.