Android app on Google Play

 

ऋषि ऋष्यश्रृंग यांच्या जन्माची कथा

 


ऋषि ऋष्यश्रृंग महात्मा काश्यप (विभाण्डक) यांचे पुत्र होते. त्यांचे वीर्य अमोघ होते आणि तपश्चर्येमुळे अंतःकरण शुद्ध झालेले होते. एकदा ते सरोवरात स्नान करण्यासाठी गेले. तिथे उर्वशी अप्सरेला पाहून पाण्यातच त्यांचे वीर्यस्खलन झाले. ते वीर्य पाण्यासोबत एका हरिणीने प्राशन केले, ज्यामुळे ती गर्भवती झाली. प्रत्यक्षात ती हरिणी ही एक देवकन्या होती. काही कारणाने ब्रम्हदेवाने तिला शाप दिला होता की तू हरीण प्रजातीत जन्म घेऊन एका मुनींना जन्म देशील तेव्हाच तुझी या शापातून मुक्तता होईल. याच शापामुळे महामुनी ऋष्यश्रृंग त्या हरिणीचे पुत्र झाले. ते फार मोठे तपोनिष्ठ होते. त्यांच्या डोक्यावर एक शिंग होते. म्हणूनच त्यांचे नाव ऋष्यश्रृंग असे पडले होते. वाल्मिकी रामायणानुसार राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. हा यज्ञ मुख्यत्वेकरून महामुनी ऋष्यश्रृंग यांनीच संपन्न केला होता. या यज्ञाचे फळ म्हणूनच प्रभू श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शतृघ्न यांचा जन्म झाला होता.

 

अद्भुत पौराणिक जन्म कथा

passionforwriting
Chapters
धृतराष्ट्र, पण्डु आणि विदुर यांच्या जन्माची कथा :
कौरवांच्या जन्माची कहाणी
पांडवांच्या जन्माची कथा
कर्णाच्या जन्माची कथा
राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा
पवन पुत्र हनुमानाच्या जन्माची कथा
हनुमान पुत्र मकरध्वज याच्या जन्माची कथा
द्रोणाचार्य यांच्या जन्माची कथा
ऋषि ऋष्यश्रृंग यांच्या जन्माची कथा
कृपाचार्य आणि कृपी यांच्या जन्माची कथा
द्रौपदी व धृष्टद्युम्न यांच्या जन्माची कथा
राधाच्या जन्माची कथा
राजा सगर याच्या ६० हजार पुत्रांच्या जन्माची कथा
जनक नंदिनी सीता हिच्या जन्माची कहाणी
मनु व शतरूपा यांच्या जन्माची कहाणी
राजा पृथु याच्या जन्माची कथा