स्वच्छ भारत अभियान -Clean India Campaign
स्वच्छ भारत अभियान हा भारताच्या ४,००० हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नदींच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरु केलेले राष्ट्रीय पातळीवर अभियान आहे. हे अभियान २ ऑक्टोबर २०१४ रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु झाले. त्यांनी स्वत: रस्त्याला स्वच्छ केले. मोदी म्हणाले,"महात्मा गांधींना सर्वात मोठे स्मारक म्हणजे २०१९ मध्ये त्यांच्या १५० व्या जयंतीला त्यांची स्वच्छ भारताची इच्छा साध्य करण्याची, हा भारताची स्वच्छतेसाठी सर्वात मोठा अभियान आहे. यात ३० लक्षाहून अधिक सरकारी कर्मचारी व शाळेतले व कॉलेजमधल्या मुलांनी भाग घेतला आहे."