Android app on Google Play

 

चहावाला ते प्रधानमंत्री- थरारक जीवनप्रवास

 

नरेंद्र मोदी यांचा जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९५० मध्ये वडनगर,जिल्हा मेहसाणा गुजरात येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. त्यांचा विवाह जसोदाबेन यांच्याशी झाला होता.

मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले १९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला.१९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. भारतीय जनता पक्षाचे जहाल नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा कुशाग्र बुद्धीचा व महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकतो, हे मोदींनीच दाखवून दिले. शंकरसिंह वाघेला व मोदी यांनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात मोठी भूमिका निभावली होती.