Get it on Google Play
Download on the App Store

भारत देशाचे आजपर्यंतचे सर्वाधिक लोकप्रिय प्रधानमंत्री


भाजपतर्फे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा झाली. मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक ठरले. नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत..स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.भाजपच्या गुजरात विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते.ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला.२००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजप चे स्ट्रॅटेजिस्ट होते. मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत.गुजरात च्या विकासासाठी मोदी ओळखले जातात.त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. या विकासपुरुषाचा राष्ट्रीय राजकारणाच्या पटावरील झपाट्याने झालेला उत्कर्ष अवाक करणारा आहे.