Get it on Google Play
Download on the App Store

गुजरात मधील राजकारणात प्रवेश


२००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.
गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. मोदींनी सलग तीनदा सत्ता पटकावून कसलेला राजकारण म्हणून आपली क्षमता लोकांना मान्य करायला लावली. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पद मोदींनी जवळपास चौथ्यांदा ग्रहण केले आहे.यांच्या चौथ्यांदा झालेल्या शपथविधीला अनेक राज्यांचे मुख्यंमंत्री आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे.