भूमिका
पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती दर रात्री ९० मिनिटांपासून ते २ तासांपर्यंत स्वप्न बघते. अनेक वेळा या स्वप्नांचा अर्थ लावणं खूप सोपं असतं - एखादा हरवलेला मित्र परत येणं , एखाद्या सुंदर जागेचं बोलावणं किंवा लॉटरी लागणं.
पण प्रत्येक वेळी स्वप्न एवढी साधी - सोपी नसतात. जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणचे आणि वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकाच प्रकारचे स्वप्न पाहिल्याचे सांगतात, तेव्हा या स्वप्नांबाबतचा शोध घेणं अधिक मनोरंजक बनतं. एक १६ वर्षे परवाना प्राप्त सामाजिक आणि स्वप्नांचा अधिकृत अभ्यास करणारी कार्यकर्ती सुजेन्न बर्गमानचं म्हणणं आहे की "स्वप्न ही भावनांनी विस्तृत दृश्यांची निर्मिती करणारी एक सार्वभौम भाषा आहे." बर्गमानने अशी १४ दृश्य शोधली आहेत ती सामान्यपणे नेहेमी लोकांना स्वप्नात दिसतात. बर्गमान चं म्हणणं आहे की, "स्वप्नात दिसणाऱ्या खुणा आणि दृश्यांचा काही एक पक्का असा अर्थ नसतो. पण जसे एखाद्याच्या हास्यावरून आपल्याला कळते की तो आनंदी आहे, हि दृश्य एवढी सामान्य असतात की त्यांचा एकच अर्थ निघतो."