चालुक्य साम्राज्य इ.स. ४२५ ते ७५३ आणि इ.स. ९७३ ते ११९०
सतवाहनांच्या नंतर दख्खनमध्ये
पुझचं मोठं साम्राज्य म्हणजे चालुक्यांचं. पुलकेसीन पहिला हे
चालुक्य साम्राज्याचे सर्वात प्रथम राज्यकर्ते होते. पुल्केसीन
दुसरे चालुक्य साम्राज्याचे सर्वात महान राजा होते. त्यांनी महाराष्ट्रात
आपलं स्वामित्त्व प्रस्थापित केलं व दख्खनच्या बऱ्याच ठिकाणांवर ताबा मिळवला. ६२० मध्ये हर्षवर्धनला हरवणं हे त्यांच्यासाठी
खूप महत्त्वाचं ठरलं. पण पुल्केसीन द्वितीयचा ६४२ मध्ये पल्लव
राजा नार्सिम्हावर्मनने युद्धात मृत्यू झाला. त्याची राजधानी वातापी पूर्णपणे नष्ट
करण्यात आली. त्याचा मुलगा विक्रमादित्य हा सुद्धा एक महान राजा
होता. त्याने पल्लवांविरूद्ध आपला लढा चालु ठेवला व चालुक्यांचं
वैभव परत मिळवलं. इ.स. ७५३ मध्ये त्याच्या पणतूला दंती दुर्ग नावाच्या एका सरदाराने हरवलं.
चालुक्यने ऐहोलेत इनेक मदिरं बांधली. या काळात
काही अजंठा गुफांचेही बांधकाम झाले.
राष्ट्रकुट साम्राज्यादरम्यान
चालुक्य दुबळे पडले. २०० वर्षांपर्यंत
ते राष्ट्रकुटांपासुन लपत राहिले. इ.स ९७३
मध्ये कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्यने सत्ता मिळवली व चालुक्य राज्याची पुन्हा स्थापना
झाली. त्यांना २०० वर्षांपर्यंत स्वामित्त्व मिळालं आणि त्यानंतर
ते पुन्हा – देवगिरी चे यादव, वारंगल चे
काकतिया आणि बेलूरचे होय्सलास असे विभागले गेले.
देवगिरी चे यादव :
यादवंनी आपली सत्ता एका मोठ्या
क्षेत्रात पसरवली. त्यांची राजधानी
चांदोर ( नाशिक ) मध्ये होती. त्यांनी ११व्या दशकात देवगिरी किल्ला बांधला. यादवा राज्यात
मराठी भाषेला दरबारी भाषेचा दर्जा प्राप्त झाला. यादव राडा सिंघन
ज्ञान प्रचारक होते. संच ज्ञानेश्वरही याच काळात प्रसिद्ध झाले.
१२९४ मध्ये अल्लाउदिन खलजी ने देवगिरीवर चारही बाजुंनी हल्ला केला.
शेवटी यादव हारले व देवगिरी मुस्लिम शासकांच्या हाती गेला. देवगिरीची सर्व धन-संपत्ती लुटली गेली. १३१० पर्यंत यादव साम्राज्य संपलं होतं.
वारंगल चे काकतीय
तेलगु भाषा व साहित्य काकतीय
साम्राज्याच परिपक्व झाले. त्यांनी अनेक
किल्ले बांधले. शेवटचा
राजा प्रतापरूद्न याने १३०३ मध्ये अलाउद्दीन खिलजीचा पराभव केला. १३१० मध्ये आणखी एका युद्धात त्याने अलादीनचे सेनापती मालिक काफूर याला मोठा
कर देण्याचे वचन दिले. १३२१ मध्ये घिआस-उस-दिन-तुघलक मोठ्या सैन्याबरोबर
चालुन आला व प्रतापरूद्रला बंदी बनवून दिल्ली ला घेऊन गेला. प्रतापरूद्राचे
दिल्ली पोहोचण्याआधीच निधन झाले. अशाप्रकारे काकतीयच्या सुंदर
कारकिर्दीचा अंत झाला.
बेलूर हलेबिदचा होयसला
होयसला साम्राज्याचे संस्थापक
होते राजा सला. होयसलांनी १५००
मंदिरं बांधली. त्यांची ही कला होयसला कला नावाने प्रसिद्ध झाली.
यांपैकी सर्वात प्रसिद्ध मंदिरं म्हणजे बेलूर व हलेबिद मंदिर ज्यात बारीक
नक्षीकाम आहे. आलाउद्दीन खिलजीने या साम्राज्यावर १३०८ ते १३१२
दरम्यान मात केली.