शास्त्रिय युग- गुप्ता साम्राज्य व हर्ष
गुप्ता साम्राज्य –
चंद्रगुप्त पहिला (३२०-३३५) च्या नेतृत्त्वाखाली साम्राज्याला उत्तरेत पुन्हा प्रस्थापित करण्यात आलं. चंद्रगुप्त मौर्यासारखं त्याने आधी मगध ताब्यात घेतलं. जिथे आधी मौर्य राज्याची राजधानी होती तिथेच आपली राजधानी स्थापन केली आणि याच ठिकाणापासुन उत्तर भारताच्या पूर्वेकडील राज्यांना एकत्र आणलं. याचबरोबर चंद्रगुप्तने सम्राट अशोकाच्या सरकारी सिद्धांतांनाही पुनरूज्जीवित केलं. पण त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने (३३५-३७६) व नंतर नातू चंद्रगुप्त दुसरा याने (३७६-४१५) पूर्ण उत्तर आणि पश्चिम दख्खनमध्ये साम्राज्य प्रस्थापित केलं. चंद्रगुप्त दुसरा हा सर्वात महान गुप्ता राजा होता व त्याला विक्रमादित्य असंही म्हटलं जातं. तो भारताच्या सर्वात मोठ्या संस्कृतीक शतकाचा प्रशासक होता. पाटलीपुत्र, आपल्या राजधानीशी, त्याने एकीकडे व्यवबारी आणि विवेकपुर्ण युतीने आणि दुसरीकडे सेनेच्या जोरावर आपली राजकीय कारकिर्द टिकवून ठेवली. या काळतले सर्वात अप्रतिम लेख होते कालिदास. गुप्ता-कारकिर्दीत कविता ही काही विभागांपुरताच मर्यादित होती- धार्मिक व ध्यान कविता, गीत कविता, कथा- इतिहास(सर्वात लोकप्रिय धर्मनिरपेक्ष साहित्य), आण नाटक. कालिदास गीत-कविता प्रकारात पारंगत होते तरी त्यांना त्याच्या नाटकांसाठीच जास्त ओळखलं जातं. भारतीय अंक प्रणाली- ज्याचं श्रेय अनेकदा चुकून अरबांना दिलं जातं जे हे भारतातून युरोपात घेऊन गेले जिथे तिने रोमन प्रणालीची जागा घेतली. दशांश पद्धत या काळातला एक महत्त्वपूर्ण भारतीय अविष्कार आहे. इ.स.४९९ मध्ये आर्यभट्टच्या खगोलशास्त्राशी निगडीत शोधांनी सौरवर्षांची गणना, नक्षत्रीय पिंडांचे आकार व चलनांचा उल्लएक अचूक केला. चिकीत्सेत चरक आणि शुश्रुत यांनी संपूर्ण विकसित पद्धतीचा उल्लेख केला. भारतीय चिकीत्सकांनी औषधीय, सिझरीन सेक्शन, हाडांची स्थापना आणि त्वचा ग्राफ्टींगसहीत प्लास्टीक सर्जरीत नैपुण्य मिळवलं पण गु्प्ता चीनमधून आलेल्या हुन च्या हल्ल्याला बळी पडले. ४०० च्या सुरूवातीला हुन गुप्तांवर दबाव टाकु लागले. इ.स. ४८० मध्ये त्यांनी गुप्तांवर बल्ला केला आणि उत्तर भारत काबीज केला. इ.स. ५०० पर्यंत पश्चिम भारतावरही ताबा मिळवला. आणि शेवटचा गुप्ता राजा इ.स. ५५० मध्ये मुत्यू पावला. नंतरच्या दशकांमध्ये हुन स्थानिक रहिवास्यांचा भाग झाले आणि त्यांचं राज्य कमजोर झालं.
हर्ष वर्धन
भारताचा उत्तर आणि पश्चिमी भाग यानंतर इतर राज्यकर्त्यांच्या ताब्यातून मुक्त झाला. शेवटी त्यातल्या थानेसरच्या एका राजाने, पुशाभुक्ती परिवाराचा राजा प्रभाकर वर्धन, याने सर्व आक्रमणकर्त्यांना ताब्यात घेतलं. प्रभाकर वर्धन या साम्राज्याचे पहिले राजा होते आणि त्यांची राजधानी सध्याच्या हरियाणा कुरूक्षेत्रा जवळच्या थानेसर या छोट्या शहरात स्थापन करण्यात आली होती. इ.स. ६०६ मध्ये प्रभाकराच्या निधनानंतर त्याचा मोठा मुलगा राज्यवर्धन याने कन्नौजचं राज्य सांभाळलं. मालवा राजा देविगुप्ता व गौडा राजा ससांक यांच्याशी युद्धादरम्यान राज्यवर्धनचा मृत्यू झाला. त्यामुळे १६ वर्षांचा असतानाच हर्षवर्धनला गादी सांभाळावी लागली.लवकरच हर्षांने एका भारतीय साम्राज्याची स्थापना केली. इ.स. ६०५ ते ६४७ पर्यंत त्याने उत्तर भारतातल्या एका साम्राज्यावर राज्य केलं. हर्षा बहुतेक भारतीय इतिहासातला सर्वोत्तम राज्यकर्ता होता आणि आपल्या पूर्वजांपेक्षा वेगळा, एक प्रभावशाली प्रशासकही होता. तो कलेचाही चाहता होता. त्याची राजधानी कन्नौज गंगा नदीच्या किनाऱ्यावर ४-५ मैल पसरली होती आणि तिथेमोठमोठ्या इमारतीही होत्या. त्याने गोळा केलेल्या करांमधला फक्त चौथा वाटा सरकारी कामकाजात वापरला जायचा. बाकीचे वाटे दान, पुरस्कार आणि विशेषतः संस्कृती- कला, साहित्य, संगीत आणि धर्माच्या विकासासाठी उपयोगात आणला जायचा.या काळातलं सर्वात महत्त्वपूर्ण यश हे धर्म, शिक्षण, गणित, कला आणि संस्कृत साहित्य आणि नाटक या क्षेत्रात होत. तो घर्म जो नंतर आधुनिक हिंदुत्त्वात विकसीत झाला, तो आपल्या घटकांत अचूक असण्याचा पुरावा होता. मुख्य ईश्वर, प्रतिमापूजन, भक्ती ( श्रद्धा ) आणि मंदिराचं महत्त्व. शिक्षणात व्याकरण, रचना. तर्क, कारणमिमांसा, गणित, चिकीत्सा, आणि खगोल विज्ञानाचा समावेश होता. हे सगळेच विषय उत्कृष्टतेच्या उच्च स्तरावर पोहोचले.अतिव्यापारमुळे भारतीय संस्कृती बंगालच्या खाडीच्या आसपासची प्रमुख संस्कृती बनली. या संस्कृतीचा बर्मा, कंबोडिया आणि श्रीलंकीय संस्कृतीवरही प्रभाव पडला. अनेक अर्थांनी गुप्ता साम्राज्याच्या नंतरचा काळ ‘महान भारता’चा काळ होता ज्यात भारत आणि त्याच्या शेजारी राष्ट्रांच्या संस्कृतीक किर्याकलापांनी भारतीय संस्कृतीचा मुलाधार स्थापन केला गेला. हर्षवर्धनच्या मृत्यूनंतर कन्नौज राज्याचा इतिहास इ.स. ७३० पर्यंत अनिश्चित होता, पण इ.स. ७५२ पर्यंत येशोवेर्मनने तिथे राज्य केलं. यानंतर आयुध साम्राज्य आलं. यात तिन राजे होऊन गेले.पहिला यजयुधा जे इ.स ७७० पर्यंत राज्य करत होता. आयुध नंतर पर्थिहरा राजा दुसरा नागाभट्ट याने कन्नौजवर तीबा मिळवला. हर्षवर्धन नंतर उत्तर आणि उत्तर पश्चिम भागावर प्रतिहार राज्याचं राज्य आलं आणि मध्य आणि दक्षिम भारतात राष्ट्रकुट साम्राज्य स्थापन झालं (इ.स. ६५३-९७३). राजा पला (इ.स. ७५०-११६१) पूर्व भारतात (सध्याचे बंगाल आणि बिहार) राज्य करत होता.