Android app on Google Play

 

दक्षिणचे राजे

 

कुषाण साम्राज्या दरम्यान एक अज्ञात शक्ती,सत्यावाहन साम्राज्य, दक्षिण भारतातल्या दख्खनमध्ये उदयास आली. सत्यावाहन किंवा आंध्रा राज्यावर मौर्य राजकीय समीकरणांचा प्रभाव होता. येथील सत्ता काही स्थानिक सरदारांच्या हातात एकवटलेली होती जे वैदिक धर्मांच्या चिन्हांचे व वर्नाश्रमधर्माचे पालन करत असत. हे प्रशासक उदार होते आणि बौद्ध संपदा जसे की वेरूळ आणि अमरावतीची रक्षा करत होता. म्हणून दख्खन उत्तर व दक्षिण यांच्यामध्ये एका दुव्याचं काम करू लागले जेणेकरून राजकिय, व्यापारी आणि धार्मिक विचारांचे आदान-प्रदान होऊ शकेल. आणखी खाली तीन जुनी राज्य होती, - चेरा (पश्चिम), चोला (पूर्व) आणि पंड्या (दक्षिण)- जे नेहमी स्थानिक वर्चस्व मिळवण्यासाठी युद्ध करत असत. यांना ग्रीक व अशोक सुत्रांच्या मते मौर्य साम्राज्याच्या सीमेवर वसलेले समजले जायचे. भारत त्यावेळी आठव्या दशकापासून चालत आलेल्या एका युद्धाचा साक्षीदार होता. ज्याचे मुख्य भागिदार वातापी चे चालुक्य (इ.स. ५५६-७६७), कांचीपुरमचे पल्लवा (इ.स. ३००-८८८) आणि मदुरैचे पंड्या (सातवे दशक ते दहावे दशक) हे होते. चालुक्य राजाच्या राष्ट्रकुट सेवकांनी त्यांना सत्तेवरून काढुन टाकलं. पल्लव आणि पांड्या साम्राज्य हे जरी परस्परांचे शत्रू होते तरी राजकिय वर्चस्वाची खरी लढाई ही पल्लव आणि चालुक्य राजामध्ये चालु होती.