Android app on Google Play

 

टायमपास - प्राजू आणि दगडू ची अजरामर प्रेमकथा

 

केतकी ने आयुष्यांत काहीही केले नसते फक्त हा चित्रपट केला असता तरी सुद्धा ती मराठी चित्रपटाच्या इतिहासांत यादगार बनून राहिली असती. प्राजू आणि दगडूची पौगंडाअवस्थेतील प्रेमकथा म्हणजे मराठी चित्रपटाच्या इतिहासांत एक मैलाचा दगड आहे. शिकल्या सावरलेल्या संस्कारी कर्मठ घरातील प्राजू आणि पेपर टाकणारा अशिक्षित दगडू ह्यांची हि अतिशय सुरेख प्रेम कथा आहे. इतर प्रेमकथा प्रमाणे ती हवेतील किल्ला नाही पण जमिनीत पाय रोवून राहिलेली कथा आहे.

ह्या चित्रपटातील प्राजक्ता आपल्या हृदयाचे ठोके चोरल्या शिवाय राहणार नाही.