Android app on Google Play

 

पिंजरा

 

श्रीराम लागू एका गावात मास्तर असतात. गावातील लोकांना नैतिकतेचे धडे देणे हे त्यांचे कामच असते जणू. अशांत चंद्रकला नावाची एक नर्तकी गावांत अवतरते. मास्तर जे इतरांना तमाशा पाहण्यापासून प्रवृत्त करतात ते एक विचित्र योगायोगाने चन्द्रकलेशी संबंध करून बसतात. शेवटी मास्तरांना खुनी समजले जावून मास्तर पळून जातात. अनेक वर्षांनी एक खटला उभा राहतो ज्यांत ह्याच मास्तरांना त्यांच्या स्वतःच्याच खुनाच्या आरोपात दोषी मानले जाते.

वेश्येच्या नदी लागलेला उच्च चारित्र्याचा माणूस, सुवर्ण हृदय असलेली वेश्या (prositute with a golden heart), क्षण भराच्या चुकीमुळे सर्व काही गमावून बसणारा माणूस, अलंकारिक दृष्टीने आपलीच हत्या करणारा माणूस, दुट्टप्पी व्यवहार करणारा समाज असे अनेक प्रकारचे कालातीत साहित्यातील दुवे जोडून केले हा चित्रपट मराठी हृदयात कायमचा घर करून आहे.