सामना
विनय तेंडूलकर ह्यांची लेखणी, जब्बार पटेल ह्यांचे दिग्दर्शन आणि श्रीराम लागू/ निळू फुले ह्यांचा अभिनय ह्यांचा हा सामना होता. हा म्हणजे मराठीच नाही तर जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांतील एक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.
हिंदुराव पाटील (निळू फुले) ह्या अतिशय श्रीमंत राजकारण्याकडे सर्व काही असते. सत्ता आणि ऐश्वर्य पायाखाली लोळण घेत असते. अश्यात एक दारुडा सुशिक्षित तत्वज्ञानी (लागू) ह्या राजकारण्याला सापडतो. चित्रपटात लागूनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचे नाव शेवट पर्यंत जाहीर केले जात नाही. हा दारुडा हिंदुरावना सापडतो आणि हिंदूराव त्याला अश्त्राय देतात. "मारुती कांबळेचे काय झाले?" हा प्रश्न्त चित्रपटात अनेकदा उपस्थित होतो आणि मास्तर त्यांचा तपास करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी सत्य उलगडत जाते …
ह्या