Android app on Google Play

 

हरिश्‍चंद्राची फॅक्टरी

 

१९१३ साली दादासाहेब फाळके ह्या ध्यास वेड्या माणसाने भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया रचला. एक दिवस फाळके ह्यांनी इंग्रजांनी बनवलेला एक चित्रपट पहिला आणि त्याच क्षणी भारतीय भाषेंत चित्रपट करण्याचा निश्चय केला. भांडवल उभे करण्यापासून विदेशांत जावून तांत्रिक शिक्षण घेण्यापर्यंत ह्या वेड्या माणसाने ज्या खस्ता खाल्या त्या विनोदी स्वरूपांत हा चित्रपट मांडतो. इतर थोर लोकां प्रमाणे ह्या चित्रपटातील फाळके उगाच मोठा आव वगैरे अनंत नाहीत तरी सुद्धा आपण त्याच्या ध्यासाला सलाम करतो.

ह्या चित्रपटाने अनेक पारितोषिके प्राप्त तर केलीच पण त्याच वेळी चित्रपटाचा इतिहास सांगणारा चित्रपट म्हणून सर्वच चित्रपट प्रेमींनी हा चित्रपट पाहिला पाहिजे.