माहेरची साडी
माहेरची साडी हा चित्रपट प्रत्येक मरती रसिकाला ठावूक आहे. वास्तविक पाहता ह्या साच्यातील अनेक चित्रपट मराठीत येवून गेले पण माहेरची साडी हा चित्रपट मराठी सर्वाधिक चालणारा चित्रपट म्हणून लक्षांत राहतो. प्रभात टाकीज मध्ये हा चित्रपट २ वर्षें चालला. राजस्थानी चित्रपटाच्या आधारित माहेरची साडी मध्ये अलका कुबल ह्यांची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटानंतर "गरीब बिचारी सून" अशी अलका कुबल ची इमेज झाली.