Get it on Google Play
Download on the App Store

नटरंग

अतुल कुलकर्णीने साकारलेला गुणा पहिलवान  हा तमाशा साठी वेडा असतो. तमाशा हा मराठी लोकनृत्याचा  प्रकार आहे. एक दिवस गुणा ची नोकरी जाते आणि गुणा आपली नाटक  कंपनी काढतो. तमाशा साठी नर्तकी हवी असते आणि गुणा ला नैना सापडते. तमाशा साठी हिजड्या प्रमाणे हाव भाव करणारा नाच्या हवा असतो आणि कुणीही पुढे येत नाही म्हटल्यावर गुणा स्वतः ती भूमिका पत्करतो. त्याचे कुटुंब सुद्धा त्याला साथ देत नाही आणि एक दिवस त्याला हिजडा समजून त्याचा बलात्कार सुद्धा होतो.

पण गुणा आपले ध्येय सोडत नाही. चित्रपटाच्या अंतमध्ये वयस्कर गुणाला राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते.