Android app on Google Play

 

जॉर्ज डूडनौघ्ट

 


 

जर तुम्हाला भूल देणारा अनेस्थेसिस्ट तुम्हाला भूल देत असेल तर तुम्ही नक्कीच अपेक्षा कराल की तो तुमची काळजी घेईल. पण कॅनडाचा डॉक्टर जॉर्ज डूडनौघ्ट १९८२ पासुन अनेस्थेसिस्टचं काम करत होता पण नंतर समजलं कि तो महिला पेशंट्सना भूल देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत असे. जॉर्ज डूडनौघ्टला २१ महिला बळी गेल्या. या महिला वय वर्ष २१ ते ७५ मधल्या होत्या. भूल दिल्यानंतर तो त्यांच्याबरोबर लैंगिकसंबंध ठेवायचा. पिडीत महिलेला काय होतंय हे कळायचं पण भूल दिलेली असल्याने त्यांना हलणंही जमायचं नाही. जॉर्ज डूडनौघ्ट च्या विरूद्ध गंभीर गुन्हे होते कारण लोकांचा विश्वासच बसला ाही की इतका प्रतिष्ठीत डॉक्टर असं करत होता. बऱयाच गुन्ह्यांत जॉर्ज डूडनौघ्ट ने त्याच्या पेशंटना सांगितलं की ते स्वतःच या शोषणाला जबाबदार आहेत. शेवटी २१ महिलांनी साक्ष दिली आणि २०१४ मध्ये या डॉक्टरला १० वर्षांचा तुरूंगवास झाला.