Get it on Google Play
Download on the App Store

मार्क बेन्दर्त


३०  वर्षांपर्यंत मार्क बेन्दर्त मिरामोंटे एलिमेंट्री स्कूल जी समाजातल्या खालच्या दर्जाच्या मुलांसाठीची शाळा होती , तिथे प्राध्यापक म्हणून काम करत होता. सगळ्यांना वाटायचं बेन्दर्त खूप चांगलं काम करतो आहे. पण २०१२ साली समजलं की तो आपल्या सहा ते दहा वर्षांच्या विद्यार्थ्यांचं शोषण करत होता.  एका फिल्म प्रोसेसरमध्ये बेन्दर्तविरूद्ध सगळे पुरावे होते.  बेन्दर्त मुलांचे डोळे आणि तोंड बांधत आहे असे ४० फोटो सापडले. हे कमी वाटंत असेल तर असेही काही फोटो सापडले ज्यात मुलांच्या चेहऱ्यावर झुरळं होती. घराची झडती घेतल्यावर असे अजुन १०० फोटो सापडले आणि एक सी.डी. सापडली ज्यात बेन्दर्तच्या अत्याचारांचा खुलासा झाला. बेन्दर्तचे गुन्हे २००८ ते २०१० च्या इयत्तांमध्ये घडले. त्याला बळी पडलेल्यांनी याआधी कधीच याविरूद्ध आवाज उठवला नाही कारण त्यांना वाटलं की हे सगळं सामान्य आहे. मुलांना वाटलं की हा एक खेळ आहे. २०१३ मध्ये बेन्दर्तला गुन्हा कबुल केल्यावर २५ वर्षांची तुरूंग कारावासाची शिक्षा झाली.