Android app on Google Play

 

लाजस्लो सतारी

 


 

तुम्हाला तुमचे शेजारी कोण आहेत हे माहितीये का? बऱ्याचदा लोकांना माहिती नसतं. लाजस्लो सतारी नावाच्या एका ९८ वर्षाच्या माणसाबरोबर असंच झालं. त्याचा २०१३ ला बुडापेस्ट मध्ये मृत्यू झाला. सतारी बुडापेस्टच्या एका निवासीभागात आरामात रहात होता पण तो एक नाझी युद्ध अपराधी होता. एसं म्हणतात की सतारी ऑस्च्वित्जच्या कंसंट्रेशन कँपमध्ये १५७०० ज्यू लोकांच्या मृत्यूला कारणीभूत होता.  १९४१ मध्ये सतारीने ३०० ज्यू कैद्यांना युक्रेनला पाठवुन दिलं जिथे त्यांना मारून टाकण्यात आलं. त्याला अतिशय क्रुर पोलिस अधिकारी मानलं जायचं. तो ज्यू लोकांना उसाने वगैरे मारायचा. त्यांना उघड्या हातांनीच खड्डे खोदायला सांगायचा.


युद्धानंतर सतारी युरोप सोडुन कॅनडाला आला.  बरीच वर्षे तो मोंट्रियल आणि टोरंटोमध्ये आर्ट डिलर म्हणुन काम करत होता.  १९९७ मध्ये तो तिथून गायब झाला.  पण २०१२ मध्येच नाझी शोधणाऱ्या  साईमन विसेंथल सेण्टरला सतारी बुडापेस्ट मध्ये सापडला. त्याचा पत्ता कळाल्याचा तसा काही फायदा झाला नाही कारण नंतर लवकरच तो निमोनिया होऊन मेला.