Android app on Google Play

 

डोनाल्ड हार्वे


 

१९८७ मे डोनाल्ड हार्वे या ३५ वर्षाच्या नर्सने डझनभर खून केल्याची बाब कबुल केली आणि मिडीयाला अचंबित करून सोडलं. यातले बरेच जण वयोवृद्ध होते. कोणालाच त्याच्यावर संशय आला नाही कारण तो एक सज्जन माणुस आणि मेहनती कर्मचारी दिसायचा. मिडीयाने बराच विचार केला की हार्वेने एवढे खून का केले असतील आणि बरेच अंदाजही बांधले पण खरं कारण तर अजुनंच भयानक होतं.

 

हार्वेचं सुरूवातीचं आयुष्य फार कठीण होतं. त्याचं नातेवाईकांकडून आणि शिक्षकांकडून लैंगिक शोषण झालं, तरी तो सांगायचा की शेजाऱ्यांचा त्याला फारसा त्रास व्हायचा नाही कारण त्याबदल्यात त्याला पैसे मिळत असंत.  त्याचे सगळे संबंध समलैंगिक होते ज्यापैकी एक विवाहित ठेकेदाराशीही होता. शरीर कुठल्या परिस्थीतीत काय करतं हे त्याने हार्वेला सांगितलं.

 

१९७० ते १९८७ पर्यंत हार्वेने असंख्य लोकांचे खून केले. तो पकडला जाईपर्यंत त्याचे २४ खून उघडकीस आले होते, पण ते या ही पेक्षा जास्त असु शकत होते.  खून करण्याचं त्याचं कारण?? कारण त्याला खून करायचे होते! खटला चालु असताना हार्वे स्वतःचे गुन्हे कबुल करत असताना खूप हसायचा. फिर्याद्यांनी त्याच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा मागितली होती तरी हार्वेने स्वतःचे गुन्हे कबुल केले आणि जन्मठेपेची मागणी केली.