Android app on Google Play

 

काय करू नका

 

खालील गोष्टी कुठल्याही प्रकारे टाळा

  1. "मला हे जमत नाही" ," माझ्यात हि कमतरता आहे " हे अजिबात सांगू नका. प्रामाणिक पणा हा चांगला गुण असला तरी तुम्ही इथे स्वतःला विकायला (sale) करायला आला आहात. तुमच्या चारित्र्याची पारख करणे हे तिच्यावर अवलंबून आहे. तिला विचारायचे असेल तर ती स्वतःच विचारेल.
  2. तिला तिच्या आरोग्य बाबत विचारू नका.
  3. तिला पगार वगैरे विचारू नका.
  4. आपला पगार वगैरे विचारल्यास सुद्धा सांगू नका उलट टाळून द्या. "आर्थिक दृष्ट्या मी सक्षम आहे" इत्यादी. 
  5. आपली आई हा विषय १००% टाळा. आपली आई कितीही थोर असली तरी तिच्या बद्दल बोलायची हि वेळ नाही.
  6. पहिल्या भेटींत फुले सोडून काहीही भेटवस्तू नेवू नका. फुले नेली नाहीत तरी चालतील.