तिला भेटा
इतर सर्व काही होण्यापूर्वी मुलीला भेटणे आवश्यक आहे. हि भेट शक्यतो एखाद्या सार्वजनिक जागी व्हावी उदाहरणार्थ कोफी शोप. तुम्हाला बोलण्यासाठी आवश्यक ती शांतता आणि प्राय्वसी असणे आवश्यक आहे.
अरेंज मेरेज मध्ये तुम्ही अनेक मुली बघाल ह्या साठी एक विशेष जागा निवडा. तेथील पार्किंग पासून मेनू पर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला ठावूक असल्या पाहिजेत. आधी तेथे जावून वेटर वगैरेला चांगली टीप द्या.
जागा जर तिने निवडली असेल तर तुम्ही आधी तिथे जावून या. पुण्या सारख्या शहरांत पार्किंग शोधताना वेळ फार वाया जातो म्हणून सगळी तयारी आधीच केली पाहिजे.