बातचीत
हा सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला दोन गोष्टी साध्य करायच्या आहेत. तिच्या बद्दल आवश्यक ती माहिती घेणे आणि तिला हे भासवून देणे कि तुम्ही तिच्या लायक असाल.
- तिला तिचे शिक्षण वगैरे बद्दल विचार पण तिने न विचारता आपल्या बद्दल काहीही सांगू नका.
- समजा तुम्ही तिला विचारले "आपण कुठे शिकत होता ? " आणि तिने जर उत्तर दिले कि "क्ष मध्ये" तर त्या नंतर तुम्ही तिला "मी अमुक कडे शिकत होतो" असे सांगू नका उलट तिने जे उत्तर दिले आहे त्याबद्दल जास्त विचारा म्हणजे. "तुला ते कोलेज आवडत होते का ?" इत्यादी.
- तिने आपली एखादी आवड सांगितली उदा "मला वाचन" आवडते तर तुम्हाला सुद्धा तशीच आवड असेल तर नक्की सांगा पण जास्त वेळ दवडू नका पुन्हा तिला जास्त विचारा उदा "हल्ली कुठली पुस्तकें वाचली आहेत" ? इत्यादी.
- आपल्याला काय आवडत नाही ह्यावर बोलू नका. इने जर विचारलेच "तुम्हाला सलमान खान आवडतो का?" आणि तुम्हाला तो अजिबात आवडत नसेल तर तसे सांगू नका उलट एक ठराविक साचेबंध उत्तर द्या. "मला बॉलीवूड मध्ये विशेष अशी आवड नाही पण मित्रां बरोबर वगैरे कुठलाही चित्रपट बघायला आवडतो".
- मुलीना आर्थिक सुबत्ता हवी असते. ते स्पष्ट करणे आवश्यक आहे. "तुज्या जवळ पासपोर्ट आहे काय?" "तुला गाडी चालवायला कळते काय?" हे प्रश्न फार चांगले प्रश्न आहेत.
- "तुला तुज्या भावी पतीत कुठल्या qualities बघायला आवडतील ? (qualities) हा एक प्रश्न नक्की विचारा. त्यातून तुम्हाला तिला नक्की काय हवे आहे ते स्पष्ट होईल.
- तिच्या past बद्दल अजिबात विचारू नका. तिला बॉयफ्रेंड्स वगैरे होते तरी ती तुम्हाला विचारले म्हणून सांगणार नाही. तुम्हीही आपल्या past ला वर काढू नका. समजा तिने आपणहून सांगितले तर त्याचा अर्थ असा होतो कि पलाय past मध्येच आहे. अश्या मुलीला स्वीकारणे रिस्क आहे. तिने तुम्हाला तुमच्या past बद्दल विचारले तर अजिबात सांगू नका आणि तिथून ताबडतोप काढता पाय घ्या.