Android app on Google Play

 

कर्तबगारी

 

•    पुण्यातील शनिवारवाडा महाल किल्ला, पेशवा शासन कर्त्यांचे  मराठा साम्राज्यातील आसन , याची कामगिरी बाजीरावांकडे सोपविली गेली होती.
•    बाजीरावांचा, ज्यांनी ४१ मोठी युद्धे आणि अनेक इतर युद्धे लढली, कधी हि पराभूत न झाल्याचा लौकिक आहे.
•    वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून , तुकड्यांमध्ये विभाजित झालेल्या मुघल साम्राज्याचा दुबळेपणा समजून घेणारे आणि त्याचा फायदा करून घेणारे ते पहिलेच होते. साम्राज्याच्या राज दरबारामध्ये सय्यद बांधवांचा ढळता प्रभाव हा , बाजीरावांच्या हल्ल्यांच्या निर्णयासाठी आणखी एक प्रभावी कारणीभूत घटक ठरला.
•    अनेक  भागांमध्ये  तुकडे झालेल्या मुघल साम्राज्या वर  सूड घेऊन नाश केल्या नंतर सिंधीयांची (राणोजी शिंदे )ग्वालियर येथील राज्य सत्ता, इंदोर चे होळकर (मल्हारराव ), बडोद्याचे गायकवाड (पिलाजी ), आणि धार चे पवार (उदाजी ) यांची निर्मिती मराठा साम्राज्याचा एक भाग म्हणून बाजीरावांनी केली.
•    १७२८ मध्ये त्यांनी, त्यांचे मूळ सासवड वरून आणि मराठ्यांची प्रशासकीय राजधानी सातारा वरून पुण्याला हलविली. या प्रक्रिये दरम्यान त्यांनी कसब्याचे एका मोठ्या शहराच्या पायामध्ये रुपांतर केले. त्यांचे सेनापती, बापुजी श्रीपत , यांनी सातारच्या काही बड्या प्रतिष्ठित  कुटुंबाना गळ घालून पुणे शहरामध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक केले, जी नंतर अठरा पेठेंमध्ये (नगरांमध्ये ) विभाजित करण्यात आली.
•    १७३२ मध्ये , महाराज छत्रसाल यांच्या मृत्युनंतर , मराठा साम्राज्याचे दीर्घ काळा चे घटक असलेल्या, बाजीरावांना बुंदेलखंड मध्ये छत्रसालाच्या प्रांतातील एक तृतीयांश भाग मंजूर करण्यात आला.
•    घोडदळा चे अतिशय कर्तबगार सरदार, असलेल्या बाजीरावांवर त्यांच्या सैन्य दलानि आणि लोकांनी भरभरून प्रेम केले. असे मानले जाते कि बाजीराव हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी लढले आणि मुघलांना उत्तर भारतावर नजर रोवण्या आधी , मध्य आणि पश्चिम भारतातून कायमचे हुसकावून लावले. त्यांच्या नेतृत्वाखाली , मराठ्यांनी सिद्दी (मोघुल नौसेना अधिकारी  ), मुघल, पोर्तुगीज , निझाम , बंगश आणि इतर अनेकांना पराभूत केले.
•    १९ व्या शतकातील ब्रिटीशांच्या सत्ता स्थापनेपूर्वी , संपूर्ण  १८ व्या शतकासाठी उप - खंडा मध्ये वर्चस्व  गाजविणार्या मराठा साम्राज्याची उभारणी करण्याकरिता शिवाजी महाराजां नंतर बाजीराव हे एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.