Get it on Google Play
Download on the App Store

दिल्लीची हकालपट्टी

१७३५ पर्यंत मराठ्यांनी संपूर्ण गुजरात आणि माळवा वर नियंत्रण मिळविले होते. पण काही स्थानिक मुघल अधिकारी आणि जमीनदार यांच्या  अमलाखाली असणाऱ्या शहरांनी आणि भागांनी मराठा नियंत्रणाला स्वीकारण्यास नकार दिला. मुघल सम्राट मुहम्मद शाह पण मराठ्यांना त्यांचा चौथाई आणि सरदेशमुखी चा हक्क देण्याच्या अधिकृत आदेशासाठी टाळाटाळ च करत होता. मुघल साम्राज्याचे लक्ष वेधून घेण्याच्या बाजीरावांच्या प्रयात्नानाही दुर्लक्षित करण्यात आले. मराठ्यांनी स्वतःचा अधिकार बजावण्याचे ठरविले आणि लगतच्या राजस्थान च्या प्रदेशांमध्ये लूट करण्यास सुरुवात केली. मुघलांनी हि त्यांच्या वजीर कमरुद्दीन खान आणि मीर बक्ष खान दौरन यांच्या नेतृत्वाखाली आपले सैन्य पाठवून प्रतिकार केला. पण दोघांचे हि सैन्य मराठा सेनापतींकडून मार्गस्थ झाले (वजीरांच्या सैन्याला पिलाजी जाधवांनी पिटाळून लावले आणि राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर यांनी मीर बक्ष च्या सैन्याला पराभूत केले .).

पेशवानि मग मुघलांना आयुष्य भरासाठी धडा शिकविण्याचे ठरविले. डिसेंबर १७३७ मध्ये बाजीराव स्वतः दिल्ली कडे सैन्य घेऊन निघाले. त्यांनी सैन्याला दोन भागांमध्ये विभागले. एका सैन्य तुकडीचे बाजीरावांनी नेतृत्व केले तर दुसर्या सैन्य तुकडीचे नेतृत्व पिलाजी जाधवांनी आणि मल्हारराव होळकरांनी  केले. असे असले तरी होळकरांच्या सैन्य तुकडीला प्रंचड सैन्य घेऊन चाल करून आलेल्या ,आग्रा चा शासनकर्ता आणि औध चा नवाब , सदात खान कडून मात खावी लागली. मल्हारराव होळकरांनी कशीबशी सुटका करून घेतली आणि ते बाजीरावांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तुकडीला येउन मिळाले. या दरम्यान मराठ्यांची दहशत संपली आहे असा विचार करून , सदात खानाने दिल्लीला चांगली बातमी कळविली. त्याला आकलन झालेल्या यशाच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी , दिल्ली ला अक्षरशः असंरक्षित करून इतर मुघल सेनापती हि सहभागी झाले .हीच ती वेळ होती, जेंव्हा बाजीरावांच्या सैन्याने जलद हालचालीने ,दहा दिवसांच्या प्रवासाला फ़क़्त अठ्ठेचाळीस तासांमध्ये संपवून , तळ ठोकून असलेल्या मुघल लष्कराला पूर्णपणे ओलांडले आणि दिल्लीच्या उपनगरामध्ये (२८ मार्च १७३७ ) पोहोचले.

या नंतर जे होते ते म्हणजे दिल्लीच्या उपनगरांमधील मिळालेली एकंदरीत लूट. मुघल सम्राटाने स्वतःला सुरक्षितपणे लाल किल्ल्यामध्ये कोंडून घेतले, जेंव्हा बाजीरावांनी आणि त्यांच्या माणसांनी मिळालेली लूट ग्रामीण भागामध्ये मोठय आनंदाने वाटून टाकली. आठ हजाराचे सामर्थ्यवान सैन्य घेऊन मीर हसन कोका ने बाजीरावांवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला पण ते निष्फळ पणे पराभूत झाले आणि मीर हसन स्वतः झालेल्या झटापटी मध्ये घायाळ झाला. आणि या नंतर मुख्य मुघल सैन्याने आपले बुद्धी कौशल्य एकत्रित करण्या पूर्वीच  बाजीराव आपल्या लवाजम्या सकट दख्खन ला परतले. ३१ मार्च १७३७ ला बाजीरावांच्या विजयी सैन्याने प्रंचड लुटी सह जखमी आणि लीन झालेल्या दिल्ली ला मागे सोडले. परतीच्या मार्गावर बाजीरावांनी आपल्या अनेक विश्वासू प्रतिनिधीना उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक ठिकाणी वसविले जेणेकरून नजीकच्या भविष्यामध्ये तिथे त्यांचे कायमचे प्राभावाशाली वास्तव्य होईल.