Android app on Google Play

 

पालखेडची लढाई

 

हल्ल्याची बातमी ऐकून बाजीरावांच्या सैन्याने पुण्याकडे प्रस्थान केले.  निझामाचे सैन्य मोठ्या संख्येने आणि तोफखान्या ने पेशव्याची वाट पाहत होते. पण जिथपर्यंत लढाई च्या डावपेचांचा प्रश्न होता, पेशवा निझामापेक्षा एक पाऊल पुढेच होते. लढाई च्या मैदानामध्ये निझामाच्या शक्तीशाली तोफखान्याला तोंड देण्यापेक्षा , त्यांनी निझामाच्या अखत्यारीत असणाऱ्या प्रदेशांना वळसा निर्माण करून जालना, खानदेश आणि बुऱ्हानपूर कडे कूच करीत , निझामाच्या तावडीत असलेल्या श्रीमंत मुघल चौकी ला लुबाडण्यास सुरु केले. त्यामुळे  बाजीरावांनी निजामाला त्याचा तळ सोडण्यासाठी चिथवुन दिले आणि पेशवा चा पाठलाग करण्यास  प्रवृत्त केले. असे असले तरी, पेशवा सैन्या ला पकडण्यासाठी निजामाला त्याचा जड तोफखाना मागे सोडावा लागला.  चतुर पेशव्यांना अगदी हीच गोष्ट हवी होती. जसे जसे निझामाचे सैन्य पेशवा कडे कूच करीत होते, पालखेड ला मध्यवर्ती ठिकाणी (औरंगाबाद जवळील एक पहाडी मुलुख ) पेशव्यांनी निजामाला सापळ्यात पकडले आणि घेराव टाकला. निझाम स्वतः संदिग्ध अवस्थेमध्ये सापडला, अन्न आणि पाण्याशिवाय कित्येक दिवस , शिवाय भोवती घेराव.  निजामाला लवकरच मुंगी शेवगाव (६ मार्च १७२८ ) येथे एक अपमानजनक तह करण्यासाठी भाग पाडले गेले, या शिवाय निझामाने शाहुना पूर्णपणे एकट्याना छत्रपती मानणे स्वीकारले तसेच दुसरे संभाजी यांना कायमसाठी सोडले. मराठ्यांचा चौथाई च्या हक्काला हि या द्वारे मान्यता मिळाली.