Android app on Google Play

 

बुंदेलखंड

 

मुघलांनी मुहम्मद खान बंगश शासका च्या खाली १७२७ पासून बुंदेलखंड ला घेराव घातलेला होता. स्वतः राजाने, छत्रसालांनी ( त्यांचे शिवाजी राजांच्या काळापासून चे मराठ्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबध लक्षात घेऊन ) मराठ्यांना मदतीचे आवाहन केले, पण मराठा सैन्य दुसरीकडे व्यस्त असल्यामुळे शाहू वेळेवर कुमक पाठवू शकले नाहीत.

छत्रसालांनी मुघलांना कठोर प्रतिकार केला पण जैतपूर येथे अखेरीस मुहम्मद खान बंगश कडून घायाळ झाले आणि सरतेशेवटी पकडले गेले. छत्रसालांनी पुन्हा एकदा पेशवा बाजीरावांना विनंती केली (१७२९ मध्ये )कि त्यांनी मदतीला धावून यावे , ज्यामध्ये असे लिहिले होते,

"जो गत भई गजेन्द्र की वही गत हमरी आज,
बाज जात बुन्देल की बाजी राखियो लाज"


या वेळी , बाजीराव स्वतः बुंदेलखंड च्या समीप होते.( गऱ्हा, माळवा येथे ) आणि छत्रसाल चा बचाव करण्यासाठी सैन्यासह आले. मुघल सेनापती मुहम्मद बंगश ला जैतपूर मध्ये घेराव टाकण्यात आला, (आणि त्याच्या मुलाच्या सैन्याला हि , जो कि सैन्य मदत घेऊन मार्गस्थ होता ), आणि बंगश ला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. त्याने बाजीरावांना आर्जव केले कि दिल्लीपर्यंत चा मार्ग त्याला करून देण्यात यावा जे कि बाजीरावांनी बंगश पुन्हा कधीही छत्रसालांना उपद्रव पोहोचवणार नाही या अटी खाली मान्य केले.बाजीरावांवर अतिशय संतुष्ट असलेल्या राजा छत्रसालांनी खुल्या दरबारामध्ये इथून यापुढे  बाजीराव आपले मानस पुत्र असल्याचे जाहीर केले, आणि त्यांना आपली स्वतःची जहागिरी (त्यांच्या प्रदेशाचा एक तृतीयांश भाग ) देऊन सन्मानित केले , ज्यामध्ये सागर, बांदा आणि झासी चा समावेश होता (बाजीरावांनी या भागाचे व्यवस्थापन गोविंद पंतांकडे सोपविले - जे कि नंतर गोविंद पंत बुंदेले म्हणून ओळखण्यात आले.). छत्रसालांनी ,बाजीरावांना दुसरी पत्नी करून घेण्यासाठी  आपली मुलगी मस्तानी (जी त्यांना त्यांच्या पर्शिअन मुस्लिम बायकोपासून होती )हिस हि बाजीरावांनी भेट केली. नंतर मस्तानी ने बाजीरावांच्या मुलाला जन्म दिला ज्याचे नामकरण शमशेर बहाद्दूर असे करण्यात आले.