Android app on Google Play

 

बाजीराव आणि पोर्तुगीज

 

बाजीरावांनी कोकणामध्ये  मानाजी आंग्रे यांना असलेली पोर्तुगीजांची दहशत शमवली होती . या बदल्यामध्ये आन्ग्र्यांनी बाजीरावांना वार्षिक खंडणीच्या स्वरुपात ७००० रुपये देण्याचे कबूल केले. बाजीरावांना हि पोर्तुगीजांसाठी सल्सेत्त नावाच्या टापूसाठी (मुंबईचा एक भाग , जो पोर्तुगीजांनी बाजीरावांना व्यापार धोरणाने कारखाना उभारणीसाठी भाडेपट्टी तत्वावर देण्याचे नाकारले होते.) तक्रार होतीच,  ज्याच्या धर्तीवर बाजीरावांचे बंधू चिमाजी आप्पा (मृत्यू १७४१) यांनी पोर्तुगीजांच्या क्षेत्रावर (मुंबई जवळील ) मार्च १७३८ मध्ये हल्ला केला. त्यांनी यशस्वीपणे , ठाणे, पारसिक, बेलापूर, धारावी, अर्नाळा यांना काबीज करत आपल्या विजयाचा शेवट वर्सोवा (फेब्रुवारी १७३९ ) आणि बसेन (वसई, मे १७३९ ) काबीज करून केला.