माळवा मोहीम
ऑक्टोबर १७२८ मध्ये , बाजीराव आणि सैन्याने माळवा वर हल्ला केला. त्यांच्या सैन्य दलामध्ये त्यांचा भाऊ चिमाजी आप्पा, तानोजी शिंदे, मल्हारराव होळकर आणि उदाजी पवार यांचा समावेश होता, यातील सगळ्यानीच त्यांच्या नंतर च्या आयुष्यामध्ये सेनापती आणि मराठा साम्राज्याचे शासक अशी पदे भूषविली. मराठा सैन्याने मुघल सैन्याला जिंकले आणि माळवा काबीज केला. मुघलांनी नंतर अंबरचे पहिले सवाई जयसिंग आणि नंतर मुहम्मद खान बंगश यांना प्रतिनियुक्त करून मराठ्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांना माळवा वरून हटविण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.