Get it on Google Play
Download on the App Store

स्वार आणि त्याचा घोडा

एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.

तात्पर्य

- जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.

इसापनीती कथा १५१ ते २००

इसाप
Chapters
लांडगा, कोल्हा व वानर लांडगा आणि घोडा लांडगा आणि बकरा कुत्रा आणि घंटा कोळी व मासा कोळी व रेशमाचा किडा कोल्हा व मुखवटा कोल्हा आणि लांडगा कोल्हा कावळा आणि सुरई हरिणी व तिचे पाडस हंस व बगळे घार व कबुतरे गरूड पक्षी व बाण चित्ता आणि कोल्हा स्वार आणि त्याचा घोडा खूप मित्र असलेला ससा कुत्रा व सुसर पारवा व कावळा वानर आणि कोल्हा घोडा आणि गाढव कोकीळ, पोपट व घार लांडगा आणि करडू मांजर व वटवाघूळ वानर आणि सुतार वाघ आणि चिचुंद्री सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव आणि कोल्हा शिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रा सापाचे शेपूट वेडावणारा पक्षी म्हातारा सिंह मेंढी व धनगर मत्सरी काजवा माणूस आणि दगड मांजर आणि चिमण्या माकड आणि मधमाशी कोल्हा आणि म्हातारी कोल्हा, लांडगा व घोडा करढोक आणि मासे हरिण आणि द्राक्षाचा वेल घुबडे, वटवाघुळे आणि सूर्य घार आणि शेतकरी दोन घोरपडी बोकड आणि काटेझाड बेडकी आणि तिचे पोर टोळ आणि मुंग्या सोन्याची अंडी देणारी हंसी सिंह, अस्वल, माकड व कोल्हा सिंहाची गुणज्ञता